लोकदर्शन 👉शुभम शंकर पेडामकर
काय माहिती काय जादू केली होतीस पण तुझा कोणताच शब्द खाली पडू नये यासाठी या जीवाचा नेहमी अट्टहास असायचा. शब्दांच्या प्रेमात पडणारा मी तुझ्यासमोर निःशब्द होऊन जायचो पण आज शब्द देखील मला सांगू पाहत आहेत की आज तरी व्यक्त हो कारण पुन्हा कधीच व्यक्त होण्याची वेळ येणार नाही.
नात्यांची अनेक लेबल आपण पाहिली आहेत पण आपल्या नात्याला लेबलचं नव्हतं कारण प्रेमाच्या पलीकडे काहीतरी नक्की होतं जे फक्त आपल्या दोघांनाच कळलं होतं.
माझ्या काळजीत तुझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू मला तुझ्या अवतीभवती राहण्याची भुरळ घालायचे कारण तुझ्यातली काळजी मला आपलेपणाचा विश्वास द्यायची. पण आता हाच आपलेपणा मी थांबवतोय कारण मला गुंतायचं नाही आहे.
कदाचित थोडे दिवस दोघांनाही जड जाईल पण थोड्याच तर दिवसांचा प्रश्न आहे असं मनाला सांगून ते थोडे दिवस पटकन जावे यासाठी स्वतःला व्यस्त ठेऊ म्हणजे सोपं होईल. बाकी तू २४ तास सोबत आहेस हे लक्षात रहाण्यासाठी तू दिलेली सुंदर वस्तू मी जरा जास्तच जपतो यात शंका नाही.
असो! तुझ्याबद्दल शेवटचा भाग देखील लवकरच लिहिलं.
©शुभम शंकर पेडामकर