लोकदर्शन 👉शुभम शंकर पेडामकर
कसं ! अल्लड मन असतं ना आपलं?
सतत हुरूहुर लावून जातं फक्त “त्या” व्यक्तीबद्दल ….
१३५ कोटींची लोकसंख्या असूनही काही तरी कनेक्शन आहे म्हणूनच आपल्या आयुष्यात ती व्यक्ती येते. आपल्यासोबत संवाद साधू पाहते, आपल्यासाठी सतत ढाल म्हणून पुढे उभी राहते. आपल्यात असणाऱ्या टॅलेंटचा त्या व्यक्तीला भरपूरच हेवा वाटतं असतो. आपले कलागुण आपण जपावे म्हणून त्या व्यक्तीचा केवळ फक्त अट्टहास नाही तर सतत पाठिंबा देखील मिळत असतो. आपल्याला चुकूनही कुणी रागे भरून बोललं तर रागे भरणाऱ्या व्यक्तीला वेळीचं शब्दांचा मार देण्यासाठी ती व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पुढाकार घेत असते. यामुळेच ती व्यक्ती “दिलकश” बनून जाते….
या दिलकश समोर आपण मात्र निःशब्द होऊन जातो, कधी-कधी तर बोलताना बोबडी देखील वळते, समोर ती व्यक्ती आल्यावर हात-पाय देखील थरथरू लागतात आणि हास्यास्पद बाब म्हणजे हृदयाचे ठोके समथिंग समथिंग म्हणून चिडवू लागतात.पण त्या समथिंगपेक्षा ती व्यक्ती आपल्या सोबत आहे याचा जास्त आनंद आपल्याला होत असतो.
असो! आतापुरती एवढंच.तुमच्याही आयुष्यात कुणी दिलकश आहे की नाही याचा नक्की शोध घ्या.
©शुभम शंकर पेडामकर