सावित्रीबाई फुले विद्यालयात राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
,गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,
लोकांचा राजा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ ,गडचांदूर द्वारा संचलित, सावित्रीबाई फुले विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर ,येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. धर्मराज काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे सांस्कृतिक प्रमुख पी. टी. खैरे, एमसीव्हीसी विभाग प्रमुख पी .एम.वांढरे, विज्ञान विभागाचे मेहरकुरे ,झाडे ,सातारकर , पोडे , पाटील , बावनकरसर, वासेकर ,मांढरे , कोगरे , इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय डोहे गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सांस्कृतिक प्रमुख प्रा. खैरे,यांनी प्रास्ताविका मधून राजश्री शाहू महाराजांच्या जीवनकार्य व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.तसेच सध्या देशामध्ये सुरू असणाऱ्या परिस्थितीवर सुशिक्षितांनी चिंतन करावे असा विचार व्यक्त केला.प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महेंद्रकुमार ताकसांडे यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतांना बहुजनांसाठी त्यांनी शिक्षणाचे कार्य निस्वार्थीपणे सुरू केले ती परंपरा आज कुठेतरी खंडीत होतांना दिसते आहे असा विचार व्यक्त केला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी शाहू महाराजांचा आदर्श ओबीसी समाजातील तसेच बहुजन समाजातील सुशिक्षित मंडळींनी जोपासावा व ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता आपला वेळ खर्च करावा तेव्हाच सामाजिक बदलास सुरुवात होईल असे विचार मांडले. कार्यक्रमाचे
संचालन प्रा. प्रशांत खैरे तर आभार प्रदर्शन प्रा. मेहेरकूरे यांनी केले
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सिताराम पिंपळशेंडे, शशिकांत चन्ने ,रामदास
वाढई उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *