लोकदर्शन👉 मोहन भारती
⭕सेवा कलश फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.
राजुरा (ता.प्र) :– गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनाच्या प्रत्येक पायरीवर मोठय़ा परिश्रमाने आणि जिद्दीने यश प्राप्त करावे. आवडीच्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करावे मात्र यशस्वी होऊन गुणवंत विद्यार्थ्यांनी मानवी मुल्यांची जोपासना करावी. ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले अशा आपले आईवडील, शिक्षक आणि समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सेवा कलश फाऊंडेशन राजुरा द्वारा आयोजित इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. संजय गोरे यांनी विद्यार्थ्यांनी परिश्रमात सातत्य ठेवावे, यश प्राप्तीसाठी कोणताही शार्टकट नाही तेव्हा प्रामाणिक प्रयत्नाने यशवंत व्हावे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संजय गोरे, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नामांकित शाळा महाविद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी च्या एकूण ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत धोटे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अझर सिध्दीकी, प्रदीप नागोसे, विद्यानंद मोहुर्ले, जितेंद्र नवघरे, रवी कार्लेकर, विनोद घिवे यासह सेवा कलश फाऊंडेशन राजुरा च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.