लोकदर्शन👉 नितेश केराम (तालुका प्रतिनिधी )
चंद्रपूर / पारधी टोलातील नवनिर्मित अभ्यासिकेला भेट देऊन लर्न टू एज्यूकेट कोरमच्या वतीने विद्याथ्याना बसायचे दोन दऱ्या सम्राट अशोक ज्योतीबा फुले सावित्री फुले छत्रपती शिवाजी ड्रॉ बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा संत कबीर संत तुकाराम यशोधरा अहिल्याबाई होळकर असे महामानवांचे जीवन चरित्र अवांतर वाचनाची पुस्तकं बोधकथेची पुस्तकं नोटबुक पेन ड्राईग बुक स्केच पेन बिस्कीटे भेट देऊन तिथल्या छोट्या मोठया व म्हाताऱ्या पिढी सोबत संवाद साधला
पारधी टोला वरोरा पासून तीन किमी अंतरावर असलेलं गाव नावाप्रमाणे पारधी समाजाची वस्ती शिक्षणाचा अभाव शेती व शेतकाम करून जीवन जगणारी माणसं शिक्षणाशिवाय तरोनापाय नाही व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चाललो तर यश नक्की प्राप्त होईल या विचारातून गावातील पुढारलेल्या दोन चार तरुणांनी मिळून गावातील मारोती मंदिरान नुकतच एक अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली