आषाढी एकादशी निमित्त उरण ते पंढरपूर दिंडी

 

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 22जून श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी मंडळ नवीन शेवा उरण जिल्हा रायगड, ओम साई भक्त भजन मंडळ नवीन शेवा,श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळ नवीन शेवा,श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळ माळाकोळी नांदेड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्यासाठी उरण मधून दिंडी निघाली असून उरण मधून श्री क्षेत्र पंढरपूर ला जाणारी ही पहिलीच दिंडी आहे.

मंगळवार दिनांक 21 /6/ 2022 रोजी उरण मधून पायी यात्रा दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. सदर दिंडीत हरिभक्त परायण गुरुवर्य (सर्व) देवजी महाराज बाबर, गोविंद महाराज घरत, नितीन महाराज म्हात्रे, महेश महाराज साळुंखे, राजेंद्र महाराज ढाकणे, श्रीरंग महाराज तिडके, सरस्वती ताई केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाली आहे.

कीर्तन,प्रवचन,हरिपाठ, भारुड, पोती वाचन,भजन,धार्मिक व सामाजिक कार्यक्रम असे दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप आहे. दिनांक 19/6/2022 रोजी श्री बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून दिंडी सर्वप्रथम प्रस्थान झाली. पुढे दिनांक 20/6/2022 रोजी जीवनमुक्त स्वामी मठ, नागाव उरण जिल्हा रायगड दिंडी पोहोचली.येथे मठामध्ये महाआरती करण्यात आली.रात्री नवीन शेवा येथे दिंडीची मुक्काम झाली. सदर 20 दिवसाचे हे दिंडी वारी असून मंगळवार दिनांक 21/6/2022 रोजी ही वारी श्री क्षेत्र आळंदी येथे दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे. शनिवार दिनांक 9/7/2022 रोजी क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे. उरण मधून प्रथमच श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प राजेंद्र महाराज केंद्रे यांनी दिली. ज्यांना कोणाला अन्नदान करायचे आहे किंवा आर्थिक मदत वस्तू स्वरूपात करावयाचे आहे त्यांनी राजेंद्र महाराज केंद्रे(फोन नंबर 87795 56511) अथवा मंडळातील कोणत्याही सदस्याकडे संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *