लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी 👉 महादेव गिरी
वालुर येथुन जवळच असलेल्या पारडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे दि.21 जुन मंगळवार रोजी सकाळी जागतिक योग दिन मुख्याध्यापक मैफळसर यांच्या मार्गदर्शनाखालीउत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहशिक शाम रूपनर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळी योगासने करण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी शाम रुपनर व विद्यार्थ्यांनी योगासने करून जागतिक योगदिन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक मैफळ सर,एस. के.रुपनर, एस.पि.डिकर,शेळके सर, माने सर, काकडे सर,काळे सर आदी उपस्थित होते.