लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉महादेव गिरी
वालुर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जुन मंगळवार रोजी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जि.एम.कावळे यांनी विविध योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली. जि.एम.कावळे व विद्यार्थ्यांनी विविध योगासने करून जागतिक योगदिन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे, मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर, बि.व्हि.बुधवंत, आर.बि.राठोड, एम.एस.गिरी, डि.आर.नाईकनवरे, एस.ए.महाडिक, सौ.एस.आर.सोनवणे, व्हि.एन.बोंडे, बि.बि.मोरे, सौ.जे.बि.शिंदे, जि.आर.मळी आदी उपस्थित होते.