लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात
डॉ .शंकरराव खरातl यांच्या साहित्याचा चौमुलखी जागर व्हावा आणि त्यांचे राज्याला प्रेरक ठरेल असे स्मारक उभारण्यासाठीच आटपाडीत दोन दिवसीय साहित्य संमेलन घेतल्याचे उदगार संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी काढले .
डॉ .शंकरराव खरात यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त ११ आणि १२ जुलै रोजी जन्मशताब्दी साहित्य संमेलन होणार असून त्यानिमित्ताने बाबासाहेब देशमुख सुतगिरणीवर आयोजित आढावा बैठकीत राजेंद्रआण्णा देशमुख हे बोलत होते .
मराठी साहित्य विश्वात माणदेशी साहित्य आणि साहित्यीकांना मोठे स्थान आहे . आपल्या भागातून ५ मान्यवर साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हे आपणास भुषणावह आहे . त्यानंतरच्या पिढ्यातील साहित्यीक लेखक, कवी,कथा, कादंबरीकार, चित्रपट नाट्य क्षेत्रातील मान्यवर, आत्मचरित्रकार, कलांवत अनेकांनी देशभर नावलौकीक केला . या उज्वल परंपरेला साजेल असे साहित्य संमेलन आपण सर्व जण मिळून करूया . या साहित्याच्या प्रवाहात येताना सर्व जण जात, पात, धर्म, गरीब, श्रीमंत, पक्ष संघटना असे कसलेही भेद न ठेवता माणदेशी साहित्य प्रेमी म्हणूनच आपण सर्व जण एकत्र आलो आहोत . हीच भावना कायम ठेवून साहित्याच्या मोठ्या परंपरेला आपण नेहमीच समर्थन साथ देवूया . असे स्पष्ट करून राजेंद्रआण्णा देशमुख यांनी, निष्ठेने, एकसंघ भावनेने, आपण साहित्य क्षेत्रात कार्यरत राहीलो तर भविष्यात माणदेश आणि आटपाडी संपूर्ण विश्वात साहित्य नगरी, प्रेरक नगरी, मार्गदर्शक नगरी, स्मारक नगरी म्हणून नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही . असे ही राजेंद्रआण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले .
यावेळी डॉ रविंद्र शंकरराव खरात यांनी संमेलनासाठी एक लाख रुपयेचा धनादेश दिला . पुण्याचे दयानंद सोनकांबळे यांनी पाच हजार रुपये दिले तर प्रा .डॉ . कृष्णा इंगोले यांनी पाच हजार रुपयेची देणगी जाहीर केली .
यावेळी आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीरावतात्या पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक , डॉ . रविंद्र खरात , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते अरुण वाघमारे, साहेबराव चवरे, भाजपाचे नेते आप्पासाहेब काळेबाग, स्नेहजीत पोतदार, डॉ . कृष्णा इंगोले डॉ. सयाजीराजे मोकाशी, सुभाष कवडे, कुमार लोंढे, मंगलनाथ देशमुख, सुरेश बालटे, रणजित ऐवळे इत्यादींनी सुचना मांडल्या .
यावेळी प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके,प्रा . सीताराम सावंत, अरविंद चांडवले , प्रा. सुनिल दबडे, माजी प्राचार्य तानाजीराव वाघमारे, वसंतराव विभूते, दयानंद सोनकांबळे पुणे, आप्पासाहेब खरात, विठ्ठलराव लांडगे, दादासाहेब कदम, डॉ कुमार लोंढे, रविकिरण जावीर, स्नेहजीत पोतदार, रणजीत ऐवळे, डॉ . यु .एस . चंदनशिवे, शिवाजीराव बंडगर, रमेश जावीर, भीमाशंकर स्वामी, साहेबराव चंदनशिवे नवनाथ जावीर, रविंद्र लांडगे, विशाल काटे, जोतिराम काटकर,नामदेव खरात, महादेव खरात, विक्रम मोटे, शशिकांत मोटे, समाधान खरात, विवेक सावंत, सनी कदम, आबा ऐवळे, संतोष वाघमारे, समाधान खरात, शशिकांत मोटे, विक्रम मोटे, सुरेंद्र कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते .