लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित
सावित्रीबाई फुले विद्यालय,गडचांदूर चा
सत्र 2021- 22 इयत्ता दहावीचा निकाल 93.65% लागला आहे.
परीक्षेला एकूण 126 विद्यार्थी बसले होते त्या पैकी
118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांक
कु.शर्वरी यादव
किन्नाके-86.80%हिने प्राप्त केला आहेत
द्वितीय कु. तन्वी अर्जुन कोडापे -85.40%
तृतीय कु.अनुष्का अशोक सावरकर 84.20.%
चतुर्थ कु.आयशा जलील शेख-81.60%
पाचवा कु. क्षमता मनोहर जुलमे.-81.40%
सहावा क्रमांक कु. हर्षदा विठोबा पिंपळकर -80.20% हिने पटकाविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी सचिव माजी सभापती माननीय नोगराज मंगरूळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यानी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी परिश्रम जिद्द व चिकाटी या गुणांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे ,पालकवर्ग, तसेच शाळेतील शिक्षक नामदेव बावनकर, राजेश वासेकर,माधुरी उंमरे यांचेसह गुणवंत विद्यार्थी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश मांढरे यांनी मानले कार्यक्रमातला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.