*लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे.*
उरण दि जून मधुबन कट्टा उरण व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )तर्फे 80 वे कविसंमेलन उरण शहरातील विमला तलाव येथे मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष -एम.वाय शेलार तर जेष्ठ कवी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील,जेष्ठ नागरिक बाळाराम म्हात्रे,भगवान पोसू म्हात्रे,रमेश माळी,नारायण गजानन भोईर,प्रभाकर दाते,मारूती तांबे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर तर प्रास्ताविक – मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.कवीश्री अरूण.द.म्हात्रे,राम म्हात्रे,भ.पो.म्हात्रे,भालचंद्र म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, रायगड भूषण एल बी पाटील, संजय होळकर आदी कवी या कवी संमेलनात सहभागी झाले होते.
या वेळी पी एम मोदींना न पाठवलेली पत्रे या पुस्तकाला अनंत काणेकर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. भ .पो .म्हात्रे यांनी विज्ञानरूची काव्यसंग्रह व मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी जागर तंबाखूमूक्तीचा हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आणि संजय होळकर यांना पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने अभिनंदन करण्यात आले. त्याच प्रमाणे भालचंद्र म्हात्रे सेवानिवृत्त कस्टम अधिकारी यांनी सेवानिवृत्ती प्रीत्यर्थ उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.