⭕आई वडिलांच्या यांच्या कष्टाची केले फलित
लोकदर्शन अमरावती प्रतिनिधी👉
मोहित राऊत
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील इयत्ता 10 वी चा निकाल 17 जून 2022 रोजी नुकताच लागला आहे. तेव्हा दहावी परीक्षेमध्ये ही मुलींनीच बाजी मारून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तेव्हा अमरावती शहरातील शिवकृपा हायस्कूल जलाराम नगर अमरावती या शाळेमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी रसिका निलेश अंभोरे हिने संपूर्ण शाळे मधून इयत्ता दहावी मध्ये 91.20% गुण संपादन करून संपूर्ण शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे फलित केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. रसिका चे वडील हे अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुकलेश्वर या छोट्याश्या गावातून ग्रामीण भागातून अमरावती शहरांमध्ये येऊन आपल्या मुलींना उच्च शिक्षित व उच्च प्रतीचे शिक्षण मिळवण्याकरता दिवस-रात्र अथक मेहनत करून मुलींना शिक्षण देण्याचे प्रयत्न करीत आहेत. रशीकाचे आई-वडील हे अमरावती व भातकुली तहसील मध्ये वाईंडरचे काम करतात. तर रसिकाला भविष्यामध्ये डॉक्टर बनायचे असून पुढील शिक्षण ये विज्ञान क्षेत्रात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर ते आपला आदर्श भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत असून ते त्यांच्याच प्रमाणे उच्चशिक्षित होऊन समाजाकरिता विशेष कार्य करून दाखवण्याचा तिचा मानस आहे. तर ते आपल्या यशाचे श्रेय आहे शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप नानोटे वर्गशिक्षक सुनील कापसे व इतर शिक्षक शिक्षिका योगिता शिरभाते अर्चना टापरे प्रवीण बैतूले व आई वडील यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल तिला संपूर्ण शाळेतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याच प्रमाणे मित्र नातेवाईक यांच्याकडूनही शुभेच्या देण्यात येत आहे.