प्रा. एच. के जगताप यांना पीएचडी पदवी प्रदान.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 15 जून
उरण तालुक्यातील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. एच. के. जगताप यांना सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाची पी.एच.डी पदवी प्राप्त झाली आहे.

मनमिळावू, विद्यार्थीप्रिय,कुशाग्र बुध्दीमत्तेचे, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून प्रा. जगताप सर्वाना सुपरिचित आहेत. त्यांनी रायगड जिल्हयातील औदयोगिकीकरणाचा कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम (1991 ते 2015)Impact of Industrialization on Agriculture In Raigad District (1991 to 2015) या विषयावर प्रा. डॉ अभय शेंडे मॉर्डन कॉलेज ऑफ एस एस सी शिवाजीनगर पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले आहे. याबददल संस्थेचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपचंद्र शृंगारपुरे, प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड,अर्कोटन्सी विभाग प्रमुख प्रा. के. ए. शामा, ज्येष्ठ प्रा. व्ही. एस. इंदूलकर, प्रा. डॉ.पराग कारूळकर, प्रा. आनंद गायकवाड,डॉ. एम जी लोणे,प्रा. डॉ. चव्हाण, प्रा. डॉ. हिंगमीरे, प्रा. ठावरे प्रा. कांबळे मॅडम,अधिक्षक तानाजी घ्यार, अकाउंटन्सी ऍण्ड फायनान्स विभागातील सर्व प्राध्यापक, प्रा धारासुरकर , आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी प्रा. एच के जगताप यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सोशल मिडिया द्वारेही विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *