लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– शासकीय विश्रामगृह राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती या चारही तालुक्यातील विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजना अमलबजावणी, समस्या व निदान यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच अन्य विविध योजनांचा समावेश होता. चारही तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित विभागातील जनकल्याणाची कामे तातडीने मार्गी लावावेत, काही अडचणी आल्यास त्याचे निदान करण्यासाठी प्रयत्न करावेत मात्र जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकार्यांना दिले.
या प्रसंगी राजुराचे तहसिलदार हरीश गाडे, कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, व्हि. एम. खापने, एम. पी. खामनकर, प्रवीण चिडे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, कोरपना चे विजय पेंदाम, जिवती चे भागवत रेजिवाड, विभागीय अभियंता जिवतीचे एस. एम. आस्कर, राजुरा चे एस. व्ही. पवार, गोंडपिपरी चे डी. एस. सावसाकडे, कोरपना चे डी. बी. बैलमवार, सहाय्यक अभियंता कुणाल येनगंदेवार, अमोल मावलीकर, सतीश खोब्रागडे यासह विविध विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.