लोकदर्शन 👉पुसद प्रतिनिधी,
युनियन बँक आॅफ इंडीया शाखा महागांव व विविध कार्यकारी सोसायटी काळी दौ.च्या वतीने पिककर्ज वाटप सुरू करण्याबाबत उदासिनता दिसून पडत होती त्यामुळे शेतकरी हा बँकेच्या पाय-या ओलांडून त्रासला होता त्यातच बँकेच्या कृषी कर्ज वसूली अधीकारी यांनी ८०:२० चा कापुस व सोयाबीनच्या नव्या लादत असलेल्या रेषोमुळे दिलेल्या फाईल्स बदलन्याचे नवे काम ही सोसायटीच्या कर्मचा-यांना लागले असते तर ही प्रक्रीया अजूनही लाबंली असती त्यात पेरणीचे दिवस येणार असतांना शेतात लागलागवडीची शेतक-यांना चींता ग्रासली होती ही शेतक-याची तगमग लक्षात घेता बँकाची उदासिनता पाहता मान्सुनपुर्व व पेरणीपुर्वी शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करण्याकरीता संबंधीत बँक व सोसायटीला सुचना कराव्यात अश्या आशयाच्या मागणीचे निवेदन ई-मेल व्दारे जिल्हाधीकारी यवतमाळ यांना सौ संध्याताई संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महागांव यांनी केली होती सोबतच प्रसारमाध्यमातून याबाबत वृत्तही प्रकाशीत झाल्याने जिल्हाधीकारी प्रशासनाने याबाबत संवेदना दाखवत तात्काळ अंमलबंजावणी करणेबाबत संबंधीत बँक व सोसायटीला कर्ज वाटप तात्काळ करण्याच्या सूचना केल्या यामुळे बँक प्रशासन खडबडून जागे झाले व पिककर्जवाटपाची तात्काळ महागांव येथे वसूली अधीकारी यांनी बैठक घेउन सोसायटीचे कर्जवाटप प्रक्रीयेला गती दिली व कर्जवाटपास सुरुवात केली असल्याने शेतकरी अद्याप मान्सुनचा पाऊस न आल्याने व पेरणीपुर्वी पिककर्ज मिळत असल्याने सुखावला अाहे केवळ ४ दिवसातच ३कोटी ७५ लाख रुपयाचे पिककर्ज वाटप काळी दौ वि.का.स.सो.काळी दौ. च्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा काळी दौ च्या वतीने करण्यात आले आहे हे विशेष: त्यामुळे पिक लागलागवडीची चींता मिटली आहे याबाबत सौ.संध्या संदेश रणवीर यांच्या शेतकरीहीतार्थ संवेदनशील मागणीला व प्रयत्नाला यश आल्याने त्यांच्या प्रति कृतज्ञता शेतकरी व्यक्त करत आहे.