लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून क्षेत्रातील गोरगरीब, गरजु नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून आपल्या सौजन्याने काही गरजूंना मदत पोहचत आहे हे माझे सद्भाग्य आहे. तीन चाकी स्वयंचलित सायकलीमुळे क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना मोलाची मदत होऊन आत्मनिर्भर जीवन जगण्याचा त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल असे प्रतिपादन मागासवर्गीय मुलांचे शासकीय विश्रामगृह राजुरा येथे आयोजित दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकल वाटप कार्यक्रमात आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या सौजन्याने आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजुरा विधानसभा क्षेत्रातील ५३ दिव्यांग बांधवांना मदतीचा हात पुढे करून तीन चाकी स्वयंचलित सायकल चे वितरण करण्यात आले. तसेच आनखी स्वयंचलित तीन चाकी साकल वाटपाचे उद्दिष्ट असून पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त यावलकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तुकाराम झाडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सेवादल काँग्रेस अध्यक्ष दिनकर कर्णेवार, माजी जि प सदस्य मेघाताई नलगे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उमेश राजूरकर, विनोद नागापुरे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, जेष्ठ नेते शंकर गोनेलवार, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, देवेंद्र बट्टे, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, दिपा करमनकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, कृ.उ.बा.स चे माजी संचालक अविनाश जेनेकर, अशोक रेचनकर, निलेश संगमवार,रामभाऊ देवईकर, नामदेव सांगडे, कवडु सातपुते, सर्वानंद वाघमारे, धनराज चिंचोलकर, उमेश गोरे, चेतन जयपुरकर, राजु पिंपळशेंडे, अनंता एकडे, विजय कनकाटे, ब्रिजेस जंगिडवार, इर्शाद शेख, योगिता भोयर, आकेश चोथले, गृहपाल धोडरे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे आयुक्त यावलीकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन अजित कांबळे यांनी केले.