लोकदर्शन 👉14 विठ्ठल ममताबादे
उरण दि 14 जून निसर्गाप्रति असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शविते .आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल आणि ह्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले ते पर्यावरण प्रेमी, वन्यजीव प्रेमी केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सहचारिणी निसर्गप्रेमी सावित्रीची लेक राणी ताई मुंबईकर आणि सुजाताताई कडू व प्रतिक्षादीदी म्हात्रे या निसर्गप्रेमी सोबतीनींच्यां रूपानं. हिंदू संस्कृतीत जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस सर्व महिला भगिनीं वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात.ह्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं या करीता वडाच्या झाडाची मनोभावे पूजा अर्चना करतात हे करत असताना मात्र राणी ताई मुंबईकर ह्या निसर्गप्रेमी सावित्रीने सुजाताताई प्रविण कडू आणि प्रतिक्षादीदी म्हात्रे यांच्या सोबतीने आणि सहकार्यानं एक अनोखा संकल्प करत उरण येथील वेश्वी गावातील एकविरा देवी मंदिराच्यां वाटेवर वटवृक्षाच्यां झाडांची लागवड करून वटपौर्णिमा हा सण साजरा केला. सण-संस्कृती सोबतच विज्ञानाची कास धरणाऱ्या ह्या सावित्रीच्या लेकीनं वटवृक्षांचीं लागवड करत पर्यावरणाच्या संरक्षणा सोबतच ह्या मानवजातीला ऑक्सिजन रुपी नवसंजीवनी देणाऱ्या ह्या शतायुषी महावृक्षांची लागवड करून समाज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आणि म्हणूनच ह्या अनोख्या पध्दतीनं निसर्गा सोबत पर्यावरण पूरक धाग्याची वीण विणत नैसर्गिक, धर्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्व असणाऱ्या वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या केअर ऑफ़ नेचर संस्थेच्या निसर्गप्रेमी सावित्रीच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.