लोकदर्शन कोल्हापूर – शाहूवाडी👉 (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
“आई रत्नाई तरुण मंडळ व कै. श्यामसुंदर पाटील ( बापू) प्रेमी युवा मंच, बुरंबाळ” तसेंच “”सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई”” यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 11जून आणि 12जून रोजी मौजे बुरंबाळ तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ली ते ७ वी च्या ९० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्षा अरुणा कांबळे, सदस्य आनंद पाटील, दिपक म्हेत्तर, शोभा कांबळे, रेश्मा पाटील, आपल्या गावचे प्रथम नागरिक उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मारुती पाटील, मंडळाचे सदस्य श्रीकांत आयरे, सुनील पाटील, शशिकांत आयरे, विनोद भारमल, शुभम पाटील, सुरज पाटील, माजी पो.पाटील, बळवंत पाटील, शंकर आग्रे, गावचे सुपुत्र व अनुस्कुरा केंद्राचे केंद्रप्रमुख आयरे सर, शाळा मुख्याध्यापक जाधव आणि गावातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुलांना आयरे सर, श्रीकांत आयरे, सुनील पाटील व जाधवर सर यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस आपल्याला शालोपयोगी वस्तू मिळणार या ईर्षेने सर्व मुले आनंदी होती. गावातील सर्व मुलांना शालोपयोगी वस्तू उपलब्ध करण्यासाठी तरुण वर्गाने खूप मोठे योगदान दिले. इतकंच नव्हे तर केवळ विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातील तरुण मित्रांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अथक मेहनत घेवून त्यांना ते वेळेत मिळवून दिले याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळांतर्फे तसेच शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून खूप कौतुक केले जात आहे.