सोलापूर च्या शुभांगी गादेगावकर अनेक पुरस्काराने सन्मानित

लोकदर्शन 👉राहुल खरात

. प्राथमिक विभागात, सहाय्य
क शिक्षिका या पदावर अभिनव विद्यामंदिर, हिंदी माध्यम, गोडदेव, भाईंदर (पू) येथे कार्यरत असणाऱ्या *डॉ.सौ.शुभांगी गणेश गादेगावकर* मीरा रोड, जिल्हा- ठाणे यांनी साहित्य, शिक्षण, समाज अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना वुमन वेल्फेअर फोरम, मुंबई, महाराष्ट्र *आदर्श शिक्षिका पुरस्कार* दिनांक २९/०५/२०२२ रोजी प्रमुख अतिथी मा. सौ.ज्योती ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.तर त्यांच्या साहित्यिक लेखनाची पोचपावती दिनांक ११/०६/२०२२ रोजी *हसरी फुले* या बालकविता संग्रहास शब्दगंध साहित्य परिषद अहमदनगर यांच्या तर्फे अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन देण्यात आली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.कथा, कविता, लेख वर्तमानपत्रे, मासिके यांमधून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत *राष्ट्रीय साहित्य सेवा सन्मान पुरस्कार* रंगतरंग साहित्याचे, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांनी दिनांक १०/०६/२०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते वाशी, नवी मुंबई, साहित्य मंदिर सभागृहात प्रदान केला.त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *