लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानी केलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नुपूर शर्मा यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वरोऱ्यातील मुस्लिम समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष अय्युब खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी खालच्या स्तरावर जाऊन इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केले होते. दिल्ली भाजपाचे मिडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी देखील वादग्रस्त ट्वीट केले. नुपूर शर्मा व नवीन जिंदाल याच्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. दोन समाजात तेढ, आपसी द्वेष, देशात एकमेकांच्या मनात कटूता, अराजकता निर्माण होईल, मुस्लिम धर्मियांची, विशेषकरून प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची प्रतिमा मलीन होईल, असे विधान करणाऱ्यां नुपूर शर्मा व नवीन जिंदाल याच्या विरुद्ध एफ आयआर दाखल व अटक करून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
शिष्टमंडळात मौ. मुझाहिर आलम, मौ.अझहर, मौ. मुज्जमिल, मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली अशफाक शरीफ, राहील पटेल, शाहीद अख्तर, बशीर अण्णा, सै. नुरूलहुदा, जमील भाई, मोहम्मद शेख, मोहसीन सैय्यद शब्बीर शेख, मोहसीन रजा, इक्बालभाई, शाबानभाई, मुश्ताक भाई, मुज्जमिल शेख आदींचा समावेश होता.