भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड

 

  • ◆ राज्यस्तरीय पहिले संमेलन 17 व 18 जून रोजी चौफुुला येेेेथे होणार

लोकदर्शन दौंड 👉 राहुल खरात

, ता.11 जून ः मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता. दौंड ) येथे होणा-या पहिल्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन दि.17 व 18 जून 2022 रोजी होणार आहे.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त राजाभाऊ जगताप, डॉ भालचंद्र सुपेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे, दीपक पवार, एम.जी.शेलार, रवींद्र खोरकर उपस्थित होते.

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
श्री. यादव हे गेली वीस वर्षे साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विपूल लेखन केले आहे. वारीच्या वाटेवर या गाजत असलेल्या ऐतिहासिक महाकांदबरीचे ते लेखक आहेत. यादवकालीन भुलेश्वर या संशोधनपर पुस्तकाच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत. उन्हातला पाऊस (कवितासंग्रह), शिवधर्मगाथा, मातकट, गुंठामंत्री, सुतसंस्कृती, साहित्यिक राजेसंभाजी, जेजुरीचा खंडोबा, पुरंदरचे कोहिनूर, पोवाडा पुरुषोत्तमाचा, महाराष्ट्र शाहीर, घुंगुरकथा, सत्यशोधक दिनकरराव जवळकर, वारीचे अंभग आदी पुस्तकाचे लेखन केले आहे.
फाटक या मराठी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीताचे लेखन केले आहे.
दिंडी निघाली पंढरीला (सिनेमाची कथा), रणांगण (पटकथा आणि संवाद), ढोलकीच्या तालावर (गीतलेखन), गुंठामंत्री (कथा), सत्याची वारी ( व्हिडीओ पटाचे लेखन), भक्तीसागर (व्हिडीओ पटाचे लेखन), दैवत माझे भुलेश्वर माहिती पटासाठी गीत लेखन, महिमा भुलेश्वराचा (गीत अल्बम),गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला या उपक्रमाचे राज्यभर शेकडो कार्यक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून काम. आकाशवाणी, दुरदर्शन, व चँनेलवर कवि संमेलनाचे शेकडो कार्यक्रमातून सहभाग. सासवड येथे 2014 रोजी झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. बारामती येथे झालेल्या पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. राज्यस्तरीय दहाव्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ठाणे येथील तिसऱ्या राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्य रत्न पुरस्कार, साहित्य गौरव, युवा पत्रकार गौरव, काव्य गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. बहुजन समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या हस्ते 2000 रोजी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय युवा पत्रकार गौरव पुरस्कार मिळाला. राज्यात साहित्य चळवळ रुजवून नवं कवी लेखकांना संधी देण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले.
1990 च्या दशकात पुणे शहरात पत्रकारिता करीत असताना दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक नवशक्ती, आदी वृत्तपत्रात पत्रकार, उपसंपादक म्हणून काम केले. दैनिक सकाळ मध्ये पंढरीच्या वारीचे केलेले वार्तांकन विशेष गाजले. जय महाराष्ट्र, मी मराठी या न्यूज चॅनल साठी त्यांनी काम केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *