लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 महादेव गिरी
सेलू तालुक्यातील वालूर येथील पुरातनकालीन सिध्देश्वर मंदिर , श्री वाल्मीकेश्वर मंदिर व बारव यास औरंगाबाद विभागाचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवार दि.10 जून रोजी भेट देवून जीर्णोध्दारासंदर्भात ग्रामस्थांबरोबर हितगुज केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल,मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार,बारव सबर्धन समिती मराठवाडा प्रमुख मल्हारीकांत देशमुख,तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, अग्रणी बँक प्रबंधक हट्टेकर,गटविकास अधिकारी मोरे,मंडळ अधिकारी तानाजी माने, , सरपंच संजय साडेगांवकर, शैलेश तोष्णीवाल, गणेश मुंडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी या अधिकार्यांचे स्वागत केले. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकारी व ग्रामस्थांच्या समवेत प्राचीन सिध्देश्वर मंदिर , श्री वाल्मीकेश्वर मंदिर, सिद्राम बादशाह मठ व बारव यास भेट दिली. या प्राचीन व ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाच्या जिर्णोध्दारासंदर्भात माहिती घेवून ग्रामस्थांबरोबर हितगूज केले. या मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या आराखड्यास प्रशासकीय मंजूरी देवून पुरातन विभागाकडे निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा सरपंच संजय साडेगांवकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केली. सिध्देश्वर मंदिर दरवर्षी पावसाने गळत आहे. त्यामुळे या प्राचीन, ऐतिहासिक राज्यसंरक्षित स्मारकाच्या जिर्णोध्दाराकरीता सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रसंगी वालूर येथील ग्रामस्थांना संबोधित केले.
त्याप्रसंगी आयुक्तांनी वालुर येथील ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण पण पार पडले.
वालूर येथे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.