लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद. भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहणार…*
मिरज
दि. १० जून २०२२
मालगाव तालुका – मिरज जिल्हा- सांगली या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली मिरज तालुका शाखा व ग्राम शाखा मालगाव यांच्या वतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन शनिवार दिनांक 11 व 12 जून 2022 रोजी व रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी विश्वभुषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे तसेच या कार्यक्रमासाठी आयु एस के भंडारे राष्ट्रीय सचिव व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल आयु एस एस वानखडे राष्ट्रीय सचिव तथा असिस्टंट स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल आयु भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,आयु डी एम आचार्य सचिव हेडकॉटर समता सैनिक दल, आयु पी एम ढोबळे असि.लेफ्ट जनरल समता सैनिक दल पुणे. आयु मोहन सावंत. हेडकॉटर उपसचिव तसेच धम्मपरिषदसाठी पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा व पुणे जिल्हा येथील सर्व जिल्हाध्यक्ष समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यानिमित्ताने मिरज तालुक्यातील मालगाव, बेळंकी, शिपुर, एरंडोली, सावळी, कुपवाड, इनाम, धामणी, अंकली, समडोळी, कसबे डिग्रज इत्यादी गावांमध्ये महिला उपासिका शिबिर राबवण्यात आलेले आहेत व त्याची सांगता माणगाव येथे होत आहे तसेच मालगाव येथे दहा दिवसीय व पाच दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन केले आहे असा भव्यदिव्य दोन दिवस कार्यक्रम असून याकरता सांगली जिल्हा सर्व तालुके व मालगाव शाखा सर्व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली जिल्हाध्यक्ष आयु रुपेश तामगांवकर यांनी केले आहे.
कळावे,
आयु रुपेश तामगांवकर
जिल्हाध्यक्ष.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली व सर्व पदाधिकारी.