लोकदर्शन👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०८/०६/२०२२ :-* महाराष्ट्र प्रशासनाने सोलापुरात शासनमान्य ताडी दुकाने सुरू करण्याचा परवाना बहाल केला आहे. परंतु सोलापुरातील कामगार बंधु – भगिनी मोठ्या प्रमाणात विरोध करीत असल्याचे दिसुन येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
सोलापुरातील दाजी पेठ फलमारी झोपडपट्टी येथे शासनमान्य ताडी दुकान दि. 5 जुन रोजी सुरू करण्यात आला. परंतु या दुकानास परिसरातील विडी, यंत्रमाग कामगार बंधु – भगिनी मोठ्या प्रमाणात विरोध करीत आहेत. येथील नागरीक बंधु – भगिनींनी फोनव्दारे संपर्क साधुन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांना ताडी दुकान ठिाकणी बोलावुन घेतले. आणि आम्हाला ताडी दुकान नको. असे तक्रार करत ताडी दुकाने विरूध्द गऱ्हाणे मांडले. त्यावेळी विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी यासंदर्भी आपणा सर्वांना घेऊन मा. जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक अधिक्षक उत्पादन शुल्क सोलापुर यांना निवेदनाव्दारे भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फलमारी झोपडपट्टी येथील ताडी दुकान विरोधात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती कारमपुरी (महाराज) यांनी सांगितली.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह अकबर शेख, गुरूनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, लक्ष्मीबाई कोळी, मधुकर गोप, महादेवी इंगळे, तुकम्मा इरकल, मंगम्मा मंगळारम, सौरम्मा सारंगी यांच्यासह माता – भगिनी – बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते. *➖🔶➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*फोटो मॅटर :- दाजी पेठ येथील फलमारी झोपडपट्टी याठिकाणी ताडी दुकानास विरोध करताना महिला दिसत आहेत. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) उपस्थित होते.*