लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या कुशल नेतृत्वातील सरकारच्या 08 वर्षांच्या कार्यकाळात देश सुरक्षित,सामर्थ्यशाली , समृध्द व आत्मनिर्भरतेच्या दिशेने झेपावला आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील उग्रवाद, हिंसाचार, अशांतता, तंटेबखेडे, हिंसक कारवायांना नेस्तनाबूत करीत भारत-बांगलादेश सीमाप्रश्न सहजरीत्या सोडवला. 70 वर्षात जे घडू शकले नाही ते मोदी सरकारने अवघ्या 08 वर्षात साध्य करुन दाखविले असल्याच्या भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मोदी सरकारच्या अष्टवर्षपूर्ती निमित्त व्यक्त केली आहे.
*ईशान्य भारत राष्ट्रीय प्रवाहात, उग्रवाद संपवला*
भाषावाद, वर्गवाद, राज्या-राज्यातील सीमावाद, नव्या राज्याची मागणी, हिंसक घटनांमुळे देशात गेली 70 वर्ष कधीच शांतता प्रस्थापित होवू शकली नव्हती. आसाम, मेघालय, त्रिपूरा, अरुणाचल प्रदेश, मणिूपर, नागालॅंड आदी पूर्वोत्तर राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न होते. या सर्वांवर शांततापूर्वक मात करण्यास मोदी सरकार यशस्वी ठरले. केंद्रीय मंत्र्यांना स्वतंत्र अधिकार व जबाबदारी देवून त्यांनी देशाला नवी दिशा दिली. अनेक राज्यात कधीच मतदान झाले नाही आज शांततेने मतदान होत आहे व कधीकाळी 30 ते 35 टक्के होणारे मतदान आज 70 ते 80 टक्यांवर पोहचले आहे. हे सरकारच्या कुशल नेतृत्व व विधायक धोरणांचा परीणाम आहे.
*370 खारीज करुन आतंकवाद्यांचा सफाया करीत शांतता प्रस्थापित होत आहे*
लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढू लागल्याचे हे द्योतक आहे. वरील पूर्वोत्तर राज्ये भारताचा अंग नसल्याचे वाटत होते. तिथे विकासाचा मार्ग प्रशस्त करुन राष्ट्रीय प्रवाहात जोडण्याचे कार्य मोदी सरकारने केले. या राज्यांतील नागरीकांनी उग्रवाद व हिंसाचाराचा त्याग करुन लोेकशाहीवर विश्वास ठेवत भयमुक्त वातावरणाची निर्मिती करीत शांतता प्रस्थापित केली हे सरकारचे फार मोठे यश आहे. जिथे डाॅ शामाप्रसाद मुखर्जी सारख्या राष्ट्रभक्ताचे बलिदान झाले ते काश्मिर आमचे आहे. देशभक्त नागरीकांची 370 व 35-ए कलम हटविण्याची मागणी होती त्या मागणीचा आदर करीत केंद्र सरकारने लोकसभेत विधेयक पारीत करुन असंभव असलेले हे कार्य सफल केले.
*बांगलादेश-म्यानमार – रोहिंग्या घुसखोरी थांबविली*
फुटीरतावाद, दहशतवाद, नक्षलवाद मोडून काढण्यास सक्तीपूर्वक पावले उचलली. आतंकी घुसखोरी, हिंसाचारावर कठोर कार्यवाही करीत नियंत्रण मिळविले व देशाचा विश्वास सार्थ ठरविला. काॅंग्रेस(युपीए) राजवटीत बांगलादेश, म्यानमार मधील रोहिंग्या मुस्लीमांची घुसखोरी वाढली होती त्यावर सक्तीपूर्वक निर्बंध घातला. अर्धसैनिक दल व सेनेला अधिकार बहाल करीत सशक्त बनविले व घुसखारी नियंत्रणात आणित राष्ट्राचे हित सााधले. मोदी सरकार 08 वर्षांत सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरले ही देशासाठी मोठी उपलब्धी असल्याचे हंसराज अहीर म्हटले आहे.