लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*विज्ञान शाखेचा निकाल 100% कला शाखेचा निकाल 95.07% ; तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल 89.36%*
गडचांदूर:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२१-२२ चा निकाल आज (दि. ८) ला जाहीर झाला. याही वर्षी महात्मा कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100% टक्के, कला शाखेचा निकाल 95.07 % ; तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल 89.36% इतका लागलेला आहे.
महाविद्यालयातून कला शाखेतून कु.कांचन मासिरकर (89.83%), कु. साक्षी रामटेके (84.83%), कु.शहिदा अली(83.33%), कु. दुर्गा चटारे (80.17%),
विज्ञान शाखेतून प्रणय झट्टे (72.50%), कु.नितु सोनी (72.17%), कु.पूजा बोदले (71.17%),
एम सी व्ही सी शाखेतील सिध्देश्वर पुष्पलवार (72.50%), कु.रविना आत्राम(71.17%)कु.सुजाता भीमेकर(59%) गुणवंत ठरले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयात करण्यात आला.
सत्कार समारंभ च्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे,संचालक रामचंद्र सोनपितरे,प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा प्रभाकर कोल्हे होते,.
याप्रसंगी उपस्थित अतिथीच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पेढे,गुणपत्रिका देऊन कौतुक करून शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाचे संचालन प्रा नरेंद्र हेपट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, सुधीर थिपे यांनी केले, याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.