राज्यात चना खरेदीच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारने लक्ष घालावे – हंसराज अहीर

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
*चंद्रपूर/यवतमाळ* :- राज्यात यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असतांना नाफेड ने ठरवून दिलेला चना खरेदीचा कोटा पूर्ण झाल्याचे सांगत खरेदी बंद केल्यानेे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अजूनही खरेदीविना चना शिल्लक पडून आहे. याचा गैरफायदा घेत व्यापारी वर्ग कमी किंमतीने चना खरेदी करुन शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत आहे. भारतीय खाद्य महामंडळाने(FCI ) खरेदी पूर्ण न केल्याने हा कोटा नाफेडकडे वळती करुन चना व अन्य कृषीमालाची खरेदी सुरु करावी अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय कृषीमंत्री तसेच राज्याच्या कृषीमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
नाफेडने चना खरेदी बंद केल्याने चना उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश व संताप आहे. या संदर्भात हंसराज अहीर यांनी कृषी मंत्रालय व नाफेडशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देण्यात आली. नाफेड ला चना खरेदीचा दिलेला कोटा त्यांनी पूर्ण केल्याने नाफेड द्वारा नव्याने चना खरेदी करीता हात वर केल्या गेल्याने चना उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यांना किमान आधारभूत किंमत सुध्दा मिळत नाही अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी FCI चा कोटा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करुन पूर्ण करावा अशी सुचना अहीर यांनी केली असता केंद्राने सकारात्मकता दर्शवित राज्य सरकारने सुचविल्यास FCI चा कोटा नाफेड कडे वळती करुन नाफेड चन्याची खरेदी करु शकेल असे सांगीतले.
राज्याच्या कृषीमंत्री यांनी FCI चा कोटा नाफेडकडे वळती करण्याची केंद्राकडे विनंती करावी व पुन्हा नव्याने नाफेड द्वारा चना तसेच अन्य कृषी मालाची खरेदी सुरु करावी अशी मागणी करुन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून चना खरेदीमधील अडथळा दूर करण्याची विनंती केली आहे.
रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले
कृषीमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात हंसराज अहीर यांनी पूर्व विदर्भातील रब्बी(उन्हाळी) धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करुन मार्केटींग फेडरेशन मार्फत विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या धानाच्या खरेदीचे उद्दिष्ट कमी केल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने व्यापाऱ्यांना धान विकावे लागत असल्याने केंद्रीय कृषी मंत्रालय व राज्य सरकारने हे उद्दिष्ट वाढवून मार्केटींग फेडरेशन मार्फत धानाची खरेदी करावी अशी मागणीही अहीर यांनी प्रस्तुत पत्राद्वारे केली आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *