लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि जून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विंधणे , दिघोडे, वेश्वी ग्रामपंचायत कडून एनएमएमटी बस सेवा चालू करण्यास नवी मंबई परिवहन अधिकार्यांनकडे मागणी प्रस्ताव मंगळवार दिनांक ०७ जून २०२२ रोजी दाखल करण्यात आले.वाढत्या इंधन दर वाढीमुळे तसेच सीएनजी दर वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली असून पर्यायी मार्ग एनएमएमटी बस सेवा चालू करण्याचे विंधन, दिघोडे, वेश्वी ग्रामपंचायती कडून प्रस्ताव दाखल केल्यामुळे येथील नागरिकांत ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. पुढे बेलापूर रेल्वे स्टेशन वाशी बसस्थानक यांना ही जोडून या सेवेचा लाभ घेता येईल.एनएमएमटी बस सेवेचा फायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे त्याच बरोबर नागरिकांनचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशांची बचत देखील होईल. इलेक्ट्रिक वातानुकूलित एनएमएमटी चा फायदा गावातील वयोवृद्ध, दिव्यांग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी सर्वांना होणार आहे. सदर प्रस्ताव नवी मंबई परिवहन चे वरिष्ठ अधिकारी धर्मराज भगत यांच्या कडे दाखल करण्यात आले असून शिवसेनेचे उरण पूर्व विभाग प्रमुख भूषण ठाकूर, भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभाग सरचिटणीस रुपेश पाटील, माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते शरद शेळके, तसेच दत्ता चौहान यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आले.