लोकदर्शन आटपाडी (प्रतिनिधी ) 👉 राहुल खरात
दि ५ जून राज्याचे मंत्री जयंतराव पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री विश्वजीत कदम, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम हे मान्यवर आटपाडी येथे ११ व १२ जुलै रोजी संपन्न होत असलेल्या डॉ . शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनास येत असल्याची माहीती संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी दिली .
श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकार शेतकरी सहकारी सूतगिरणी आटपाडी येथे संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते .
सांगता समारंभाच्या निमित्ताने होणारे दोन दिवसीय साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी साहित्यिक, लेखक, कवी, हितचिंतक यांनी प्रयत्न करावेत, आपले योगदान द्यावे, संमेलनासाठी हातभार लावण्यासाठी शक्य त्या लोकांनी आर्थिक भार उचलण्यासाठी पुढे यावे. हे साहित्य संमेलन आपणास सातत्याने पुढे चालू ठेवायचे असल्यामुळे या वर्षाच्या पहिल्या साहित्य संमेलनात होणारे सर्वच उपक्रम ताकतीने होण्यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलावा. या निमित्त या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने माणदेशातील अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि अनेकांना यामध्ये सामावून घेता आले नाही हे जरी खरे असले तरी पुढच्या वर्षी पासून तीन दिवसीय साहित्य संमेलन घेऊन सर्वांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शंकरराव खरात यांचे यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेल असे स्मारक व्हावे यासाठी हा सर्व जागर केला जाणार आहे. आणि त्यादृष्टीने राज्य सरकारचे येणारे मंत्री, लोक प्रतिनिधी या बाबतीत यथायोग्य न्याय देतील असा मला विश्वास आहे. दोन दिवसाच्या या उपक्रमातून आटपाडी आणि माणदेशातील साहित्यिक,सांस्कृतिक परंपरेचा गौरव होणार असल्याने या दोन दिवसातील सर्व सत्रांना साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी . असे आवाहनही राजेंद्रआण्णा देशमुख केले.
प्रारंभी डॉ .शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी अनेक मान्यवरांनी सूचना केल्या . सर्व सूचनांचा आदर करत कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम करण्यात आली . यावेळी काही मान्यवरांचे सत्कार, पुस्तक प्रकाशन आणि श्री.राम नाईक, राजीव खांडेकर यांना मानपत्र देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी आटपाडीचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, विटा बँकेचे संचालक प्रदिपदादा देशपांडे, प्रा.साहेबराव चवरे,माजी प्राचार्य प्रा.डॉ. कृष्णा इंगोले, प्राचार्य प्रा.डॉ. सयाजीराजे मोकाशी, आनंद विंगकर, सुधाकर इनामदार, स्नेहजीत पोतदार, अरुण कांबळे, प्रा .सुनिल तोरणे, प्रा विजय शिंदे, प्रा . चंद्रकांत हुलगे, विठ्ठल गवळी, वसंत विभुते, आप्पासाहेब खरात, प्रा . सुनिल दबडे, आनंदराव ऐवळे, सचिन वाघमारे, जीवन सावंत ,नरेंद्र दिक्षीत, मंगलनाथ देशमुख, पांडुरंग माळी, स्नेहजीत पोतदार, रमेश जावीर, विठ्ठल लांडगे, विनोद सकट, चंद्रवर्धन लांडगे, सुभाष बनसोडे, अशोक पवार नंदकुमार खरात सदाशिव पुकळे, दगडु लिंगडे,अंकुश मुढे, हे उपस्थित होते . शेवटी सादिक खाटीक यांनी आभार मानले.