By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
*इको-प्रो तर्फे ‘उद्योग – उद्योजक विकास कार्यक्रम’ अभियानाची सुरुवात
चंद्रपूर :
इको-प्रो संस्थेच्या ‘उद्योग-उद्योजक विकास कार्यक्रम’ अंतर्गत संस्थेचे आरोग्यवर्धक व विषमुक्त उत्पादन विक्रि केन्द्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला .
‘गावठी हेल्थ स्टोअर’च्या शुभारंभ प्रसंगी स्वप्निल राठोड़, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, आशीष घोंगड़े, व्यवस्थापक, बैंक ऑफ़ बरोदा, रमेश मुलकलवार, सीतारामजी धोतरे, सुभाष शिंदे, संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितिन रामटेके उपस्थित होते. पर्यावरण सप्ताहाचे औचित्य साधुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
गावठी हेल्थ स्टोर मधून दैनंदिन उपयोगात येणारे स्वयंपाक घरातील अनेक उत्पादनाची विक्री केली जाणार आहे. या वस्तुची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. लाकडी तेलघाना आणि तेल उत्पादन प्रक्रियेची पाहणी यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केली.
इको-प्रो संस्थेने मागील वर्षीपासून ‘इको-प्रो उद्योग-उद्योजक विकास कार्यक्रम’ ची आखणी केली असून, सदस्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या नव्या अभियान अंतर्गत संस्थेच्या विविध उपक्रम करिता आणि संस्था कार्यालय खर्च भागविण्याच्या दॄष्टिने संस्थेच्या महिलांना उद्योजक म्हणून त्यांचे सक्षमीकरण करणे, संस्थेच्या बेरोजगार युवकांना उद्योग करण्यास आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याच्या सदर अभियान सुरु करण्यात आले आहे. यातील पहिला टप्पा म्हणून संस्थेचे ‘गावठी हेल्थ स्टोर’ हे आरोग्यवर्धक, विषमुक्त उत्पादन विक्रिचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या माध्यमाने उत्पादन विक्री सोबतच महिला युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबविले जाणाऱ्या योजना, मुख्यमंत्री/प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या माध्यमातून विबिध उद्योग करण्यास, त्यांना विक्री करिता बाजार उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन करीत समूह पद्धतीने छोटे-छोटे गृह उद्योगास चालना देण्याच्या दॄष्टिने, बेरोजगार महिला व युवकांना आत्मनिर्भर करण्याच्या दॄष्टिने, शेतकरी यांना शेतीपुरक व्यवसाय सुरु करण्याकरिता, इको-प्रो चे ‘उद्योग-उद्योजक विकास कार्यक्रम’ यशस्वी करण्यास विशेष प्रयत्न संस्थेच्या माध्यमाने केले जाणार आहे.
*इको-प्रो संस्था कार्यालयास जिल्हाधिकारी यांची भेट
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी संस्थेच्या कार्यलयास सदिच्छा भेट देत संस्थेचे अनेक क्षेत्रातील कार्य व पद्धती विषयी जाणून घेतले, आणि भविष्यातिल संस्थेच्या वाटचालिस शुभेच्छा दिल्या.