लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕राजुरा येथे काँग्रेस अंतर्गत पक्ष संघटन निवडणूक प्रक्रिया सभा संपन्न.
राजुरा :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने ठरवून दिलेल्या पक्ष संघटन निवडणूक कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक ५ जून रोजी सकाळी ठिक ११ वाजता गांधी भवन राजुरा येथे काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी संजयजी पासवान, आमदार सुभाष धोटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, बी. आर. ओ. राजुरा – आरिश बेग, गोंडपिपरी – बिसेन सिंग, कोरपना – विष्णू राठोड, जिवती – मनोज भोयर, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, विठ्ठलराव थिपे, रंजन लांडे, तुकाराम झाडे, गणपत आडे, प्रमोद बोरीकर, छोटुभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस सुध्दा साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पासवान म्हणाले की, भारताच्या इतिहासात काँग्रेस पक्षाचा संघर्ष हा कधीही न विसरता येणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक अडचणींवर मात करून काँग्रेसने देशाला मजबूत अर्थव्यवस्था बहाल केली. आज काँग्रेससमोर अनेक अडचणी उभ्या असल्या तरी देखील आपल्या चंद्रपूर जिल्हात विशेषतः राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे अतिशय मजबूत पक्ष संघटन दिसून येते. खरे म्हणजे एकजूट आणि मजबूत पक्ष संघटन हीच पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निस्वार्थ भावनेने जनसेवेच्या कार्यात अमुल्य योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आपण विविध धर्म, पंथ, जात, भाषा मानणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन विकासासाठी संघर्ष करीत आहोत. त्यामुळेच येथील जनतेने आपल्याला मत रूपी आशिर्वाद देऊन दोनदा आमदार म्हणून निवडून दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पंचायत, सहकारी संस्था अशा प्रत्येक आघाडीवर भरघोस यश संपादन करून येथे काँग्रेसला अतिशय मजबूत केले आहे. येणाऱ्या काळात येथे काँग्रेसला आनखी मजबूत करण्यासाठी आपण आणि आपले कार्यकर्ते अधिक परिश्रम करणार आहोत अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी जेष्ठ नेते विजयराव बावणे, हमिदभाई, उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, नगराध्यक्षा सविता टेकाम, महिला तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, नंदाताई मुसने, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, जि प सदस्य मेघाताई नलगे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उमेश राजूरकर, विनोद नागापुरे, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, आदिवासी नेते शामराव कोटनाके, जंगु पा मडावी, अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष सय्यद सकावत अली, शंकर गोनेलवार, राजुरा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश गुरणुले, कार्याध्यक्ष एजाज अहमद, मारोती बोढेकर, दिलीप डोईफोडे, दिलीप लांडे, संभाशिव कोवे, लक्ष्मण ऐकरे, आर आर यादव, विक्रम येरणे, पापय्या पोन्नमवार, राहुल उमरे, आशिष देरकर, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, सुग्रीव गोतावळे, देविदास सातपुते, निलेश संगमवार, संतोष बंडावार, राजु राऊत, बालाजी चेनकापुरे, प्रवीण नरशेट्टीवार, रोशन ठोंबरे, अनिल कोरडे, आनंदराव कोडापे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, प्रभाकर येरणे, अजय रेड्डी, भाग्यश्री आत्राम, अविनाश जेनेकर, अॅड. रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमने, प्रणय लांडे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, अॅड मारोती कुरवटकर, विकास देवाळकर, अरुण सोमालकर, अमित टेकाम, विजय उपरे, राजाराम येल्ला, अनंता एकडे, ब्रिजेस जंगिडवार, जगदीश बुटले, कोमल पुसाटे, आशिष नलगे, सय्यद साबीर, सर्वानंद वाघमारे, पंढरी चंन्ने, अर्चना वांढरे, पूनम गिरसाळवे, योगिता भोयर, धनराज चिंचोलकर, इर्शाद शेख, चेतन जयपुरकर, संदीप घोटेकर, आकेश चोथले, यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.