लोकदर्शन👉
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तहसीलदार गणेश जाधव यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. निलंगा तालुक्यात वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असतो. एका व्यक्तीला वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे कोणतीही कारवाई न करता चालू देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.
तीन महिन्यांचे एकूण १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन दीड लाख लाच देण्याचे ठरले. तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोर स्वतः आणि खासगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांनी तक्रारदारांना लाच घेताना रंगेहात पकडले.
वाळूचे तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी. वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी, प्रती ट्रक ३० हजार रुपये प्रमाणे दोन ट्रक चे ६० हजार रुपये प्रति महिने असे मागील तीन महिन्यांचे १ लाख ८० हजार रुपये मागितले होते. या रक्कमेत तडजोड करुन १ लाख ५० हजार रुपये घेण्याचे ठरले होते. ही रक्कम खासगी एजंट रमेश मोगेरगे यांच्याकडे देण्यासाठी सांगितली होती. त्याप्रमाणे आज खासगी एजंट रमेश मोगेरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांच्या घरासमोरच लाचेची मागणी केलेली १ लाख ५० हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली. यावेळी दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.