*लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०४/०६/२०२२ :-* प्रशासन विभागाने ताडी विक्री टेकेदारांना खुश करण्यासाठी शासनमान्य ताडी दुकानांना परवानगी दिली आहे. त्यास संपुर्ण राज्यात व सोलापुरात मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. सोलापूरातील शासनमान्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली व येत आहेत. या अंतर्गत ताडीच्या झाडांची संख्याही शहानिशा करण्याचे काम विरोधी संघर्ष समितीचे सदस्य करतांना अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. दक्षिण सोलापूर गंगेवाडी येथील तलाठी नेहा पवार यांनी झाडांची संख्याबाबत चुकीची व खोटी माहिती दिली आहे. असे दिसुन येते. म्हणुन सदर जमिनीत लागवड करण्यात आलेल्या ३५०० झाडांची पाहणी, पडताळणी व पंचनामा ताबडतोब करण्यासाठी तारीख व वेळ द्यावे. अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी मा. तहसिलदार साहेबांना देण्यात आले आहे.
मा. तहसिलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात तलाठी गंगेवाडी या गावचे नेहा पवार यांनी गट नं. २३८ या शेत जमिनीत ३५०० (तीन हजार पाचशे) ताडी – माडीचे झाडे असल्याचे माहितीचा अधिकार या कायद्या अंतरगत माहिती दिली आहे. परंतु तलाठी गंगेवारी यांनी अपिलात खोटी व बनावट माहिती दिली आहे. दि. २१/१२/२०२१ रोजी संदेश २४ तास न्युज नेटवर्क या चॅनेलने व्हिडिओ शुडींग मध्ये असलेली माहिती व तलाठी गंगेवारी यांनी दिलेली माहिती मध्ये जमिन आसमानाचा फरक आहे. यात संदेश २४ तास न्युज नेटवर्क या चॅनेलने व्हिडिओ शुडींग व तलाठी गंगेगारी यांनी दिलेली माहिती ची सत्यता पाहणी व पडताळणी करण्यासाठी आपण व आपले शासकीय प्रतिनिधी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोड्डू व संदेश २४ तास न्युज नेटवर्क यांच्या उपस्थित पंचनामा करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी तारीख व वेळ द्यावे. ही नंम्र विनंती. असे नमुद करण्यात आले आहे.
विष्णु कामरपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समिती सदस्य व पत्रकार सोहेल शेख, आर.टी.आय. कार्यकर्ते गणेश बोड्डु, समितीचे सदस्य माणिक पाटील, गणेश म्हंता यांचा सहभाग होता. *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*फोटो मॅटर :- २००५ माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत गंगेवाडी तलाठींनी ताडीच्या झाडांची संख्या बाबत खोटी माहिती दिली आहे. म्हणून सदर जागेची पडताळणी व पंचनाम त्वरीत करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. नायबतहसिलदार सुभांगी जाधव मॅडम यांना देतांना विष्णु कारमपुरी (महाराज), सोहेल शेख, गणेश बोड्डु, माणिक पाटील आदि दिसत आहेत.*