*लोकदर्शन👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०३/०६/२०२२ :-* सोलापूरातील महिला विडी कामगारांनी गेल्या ३० ते ३५ वर्षापुर्वी भुखंड मिळावे म्हणून म्हाडामार्फत २५०० /- (अडीच हजार) रुपये) देऊन नियमानुसार अर्ज भरला परंतु अद्यापी त्यांना भुखंड प्राप्त झाले नाही. यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गेल्या पाच / सहा वर्षापासून शासन दरबारीत प्रयत्न चालू आहे. तरीही अद्यापी भुखंड मिळाले नाही. म्हणुन या प्रश्न सर्व महिला विडी कामगारांना घेऊन मा. मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे साहेबांना भेटण्याचा निर्णय प्रलंबित म्हाडा घरकुल महिला सदस्यांच्या कामगार सेना कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सोलापूरातील बेघर महिला विडी कामगारांनी घरकुल मिळावे यासाठी गेल्या ३५ वर्षापुर्वी नियमानुसार अर्ज व प्रत्येकी २५००/- (अडीच हजार) रक्कम सुमारे ८०० महिला विडी कामगारांनी म्हाडाकडे भरण्यात आले. यापैकी ५८० लोकांना भुखंड मिळाले राहिलेले २२० कामगारांना अद्यापी भुखंड प्राप्त झाले नाही. याबाबत अनेक वर्षापासुन विविध राजकीय पक्ष व कामगार संघटनांनी त्यांच्या राजकीय वापर करून घेतला पण काहीही केला नाही म्हणून सदर प्रश्ने महाराष्ट्र कामगार सेनेने गेलया ५ / ६ वर्षापासुन प्रयत्न करीत आहे. परंतु अद्यापी कामगारांना भुखंड मिळाले नाही म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज रोजी कामगार सेना कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैइकीत प्रलंबित म्हाडा सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. शेवटी सभाअध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी उध्दवजी ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळ मोर्चात जास्ती जास्त महिला कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सदर बैठकीस विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख, सोहेल शेख, राधा आवार, गणेश म्हंता, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, कलावती शेरला, पेंटम्मा मादास, सकीनाबी जोगडे, खाजाबी बिजापुरे, चंद्रकला सग्गम, अंबुबाई शेरला, ललिता येमुल, वनिता मामड्याल, रशीदाबी शेख, नर्मदाबाई खडके, अन्नपुर्णा श्रीराम, लक्ष्मीबाई सरवदे यांच्यासह म्हाडा घरकुल सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. *➖➖➖➖➖➖➖➖===..=====.➖➖
*फोटो मॅटर :- प्रलंबित म्हाडा घरकुल सदस्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना विष्णु कारमपुरी (महाराज) समोर कामगार बंधु – भगिनी दिसत आहेत.*