लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने
*वरोरा* :- मद्यपाश आजाराला बळी पडलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या अल्कोहॉलिक्स ऍनानिमस संघटना, ( समर्पण समूह) शाखा वरोऱ्याचा चौथा वर्धापन दिन सोहळा ५ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता न.प.नेहरू उर्दू शाळेच्या सभागृहात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तथा माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, डॉ.पवन डोंगरे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे.
अमेरिकेतील बिल डब्ल्यू डॉ. बॉब यांनी ही संगत सुरू केली आहे. या समूहाच्या मिटींग प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व शुक्रवार ला सायंकाळी ७ ते ८.३० वाजता तर रविवारला सकाळी ७.३० ते ९.०० वाजता स्थानीक नेहरु चौकतील नेहरू उर्दू शाळेत भरत असते. या मीटिंगच्या माध्यमातून आजघडीला वरोरा शहरातील अनेक लोक दारूपासून दूर असून अनेकांचे उघड्यावर पडलेले संसार सुरळीत सुरू आहेत. मद्यपान आजाराला बळी ठरलेल्या व्यक्ती, कौटुंबिक सदस्यांनी संघटनेचे कार्यकर्ते के.उमेश व बी. संजय यांच्याशी संपर्क साधावा व शहरातील सर्व नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्पण समूह शाखा वरोरा यांनी केले आहे.