लोकदर्शन 👉 मोहन भारती
*धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती ते पुण्यतिथी पर्यंत धनगर समाजाचे विविध प्रश्न वर मा.मुख्यमंत्री व इतर मंत्रांना निवेदन देण्यात येणार*
मागील वर्षी संघटनेचे वतीने अहिल्यादेवी जयंती ते पुण्यतिथी असा “धनगर एस टी आरक्षण करीता एक पत्र मुख्यमंत्री ना” असा अभियान राबविला होता.त्याच पध्दतीने या वर्षी धनगर समाजातील कर्मचारी, विद्यार्थी व समाज बांधवांच्या अडचणी बाबत मा.मुख्यमंत्री व इतर मंत्री, आमदार, खासदार यांना सर्व जिल्हातुन संघटनेच्या लेटरहेड वर निवेदन देण्यात येणार आहे.
*१) धनगर समाजातील अधिसंख्य पदावर वर्ग कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणे बाबत सविस्तर निवेदन*
*२) धनगर समाजाच्या अडचणी बाबत निवेदन*…यात
*भटक्या विमुक्त जमाती ची जात निहाय जनगणना करने,
*धनगर समाजाला राज्य व केंद्रात आदीवासी आरक्षण, आदिवासी प्रमाणे योजना लागू करने
* नाँन क्रिमीलेअर मर्यादा १२ लक्ष करने
*पदोन्नती मध्ये आरक्षण पुन्हा लागु करने
* केद्रात भटक्या जमाती करीता स्वतंत्र आरक्षण व स्वतंत्र यादी तयार करने
*धनगर आरक्षण..जात प्रमाणपत्र व वैधता गैर धनगर ना न देणे
*लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धनगर विद्यार्थ्यांना आदीवासी प्रमाणे अमर्याद संधी देणे
वरील निवेदन मुख्यमंत्री ना आज मेलवर पाठवुन उपक्रम ला सुरवात केली असून मा.मुख्यमंत्री चे नावाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार मार्फत प्रत्येक जिल्ह्याचे व तालुक्यातील पदाधिकारी हे जिल्हाधिकारी ल तहसीलदार यांना शिष्टमंडळाने देणार आहे.
तसेच जयंती ते पुण्यतिथी दरम्यान आपल्या जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना शिष्टमंडळाने भेटून सदर निवेदन देणार असुन निवेदनवर त्यांचे मुख्यमंत्री चे नावे शिफारस पत्र देणे बाबत विनंती करणार आहे. हा उपक्रम पुढील ०३ महिने राबविण्यात येणार आहे,या काळात संघटना नोंदणी अभियान सुध्दा राबविण्यात येणार आहे…. राज्य सरकारने धनगर समाजाचे विविध प्रश्न वर सकारात्मक निर्णय घ्यावा व या अ
भियानात समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.. असे आव्हान श्री अनिलकुमार ढोले साहेब राज्यध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.