By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
विवाहाचे गांभीर्य तसेही दिवसेंदिवस कमी होत आहे. विवाहाला अनेक पर्याय शोधले जात असून लग्नाच्या विविध तऱ्हा समोर येत आहे. त्यात भर म्हणून एका गुजराती तरुणीने स्वतःशीच विवाह करण्याचा संकल्प सोडल्याने मीडियात जोरदार चर्चा आहे.
गुजरात येथील वडोदरा शहरातील 24-वर्षीय क्षमा बिंदू ही तरुणी स्वतःशीच लग्नगाठ बांधणार आहे, तर लग्नाचे फेरे देखील स्वतःसोबतच घेणार आहे. अशा पद्धतीचे हे भारतातील पहिले लग्न ठरणार आहे.
या लग्नाला सोलोगॅमी किंवा सोलो वेडिंग म्हणून संबोधले जात आहे. स्वतःच्या या लग्नाविषयी क्षमा म्हणाली, ” “मला कधीच लग्न करायचे नव्हते . पण मला नवरी व्हायचे होते. म्हणून मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. कदाचित असे लग्न करणारी मी पहिली व्यक्ती आहे. स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम असण्याची वचनबद्धता आहे. हे स्व-स्वीकृतीचे देखील एक कार्य आहे. लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे आणि म्हणूनच मी स्वतःशीच लग्न करत आहे.”असे मत या तरुणीने व्यक्त केले आहे.
नुकताच महाराष्ट्रात ‘विधवाच्या सन्मानार्थ कायदा करण्यात आला आहे. पतीच्या मृत्यूनंतरही सन्मानाने जगता यावे ही त्यामागची भूमिका. विवाहापूर्वीसुद्धा विवाहिते प्रमाणे जगण्याचा हा एक प्रयत्न तर नव्हे ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.