By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
#गोंडवाना विद्यापीठ हे #चंद्रपूर आणि #गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे वनांची जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील काही प्राणी पक्षी आणि साप अत्यंत दुर्मिळ असे आहेत. अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी मिळाल्यानंतर त्याचे शरीर जाळले जाते किंवा दफन केले जाते. #डर्मीटॅक्सी पद्धतीच्या मार्फत त्यांना जर प्रीझर्व करू शकलो तर ते विविध विद्यालयात किंवा विद्यापीठांत संशोधनासाठी ठेवले जाऊ शकतात. त्याकरिता भविष्यात या परिसरात चांगले डर्मीटॅक्सी संशोधक आणि एक्सपर्ट होण्यासाठी डर्मिटॅक्सी हा विषय गोंडवाना विद्यापीठात शिकवला जावा. अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्याकडे केली आहे.
****
सौजन्य : आकाशवाणी नागपूर, वृत्त विभागाची फेसबुक पोस्ट