लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दिनांक 31 मे 2022 रोजी मंगळवार ला साजरी करण्यात आली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी ठीक 7:30 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती मंदिर प्लॉट न. 15 सौभाग्य नगर, अप्सरा लॉन जवळ, हुडकेश्वर रोड नागपूर येथे करण्यात आले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीबाबत जनजागर म्हणून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅलीला सुरुवात सायंकाळी ठीक 6:00 वाजता करण्यात आली होती. बाईक रॅलीचा मार्ग अहिल्यादेवी मंदिर परिसर ते गजानन विद्यालय मार्गे उदय नगर परत जुने हुडकेश्वर पोलिस स्टेशन समोरून परत अहिल्यादेवी मंदिर हुडकेश्वर ,नागपूर ला 8:00 वाजता रॅलीचे समारोप झाले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर याच्या शोभायात्रा वर पुष्प टाकून वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत करण्यात आले होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर याच्या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात योगदान दिले त्याचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची फोटो आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते, त्यामध्ये आयुक्त डॉ. देवकाते साहेब,श्री फासे साहेब, डॉ. उत्तम सपकाळ, डॉ. रामेशजी ढवळे, श्री वैभव विवेक थापे, श्री विठ्ठलराव निघोट, श्री तुळशीराम आगरकर, श्री अतुल गावंडे, श्री गोविंदराव तास्के, श्री उमेशजी निघुटकर,श्री सुभाषजी बुधे,श्री ललितजी होळकर, श्री भाळचंदजी महाजन,श्री निलेश बोबडे, श्री खुशाल तांबडे, श्री अनिल ढोले, डॉ. दिपक कापडे, श्री प्रमोद खवडे, डॉ. परीश्चित महाजन, राजेश सरक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण ,सौ दिप्ती ताई काळे याचे स्वागत करण्यात आले होते.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रम ची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पाळणाने करण्यात आली होती तसेच अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिज्ञा घेण्यात आली ती सादर करणाऱ्या सौ अश्विनी उरकुडे, ज्योती कापडे, सौ विद्या सोनाग्रे, सौ मिनाक्षी लोही, तवले,स्मिता तांबडे, सौ वंदना बरडे, विनिता पुनसे,त्यानंतर
श्री गणेशा सॉंग लेझीम या गाण्यावर डान्स करण्यात आला तो सादर करत्या सौ अश्विनी उरकुडे, ज्योती कापडे, सौ विद्या सोनाग्रे, सौ मिनाक्षी लोही, कामिनी तवले,स्मिता तांबडे, सौ वंदना बरडे, विनिता पुनसे, गणपती च्या वेशात समर्थ उरकुडे होता,
आई भवानी तुझ्या कृपेने ( गोंधळ) सादर करणाऱ्या सौ वैशाली कातरे,सौ संगीता ढवळे ,सौ विधी बांबल,सौ उषा कातरे,कु वैष्णवी गिरे,कु लावण्या कातरे सादर केले.
पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर सादर भागवी निखार यांनी केले,
माय भवानी या गाण्यावर सादर खुशी, केतकी कानडे यांनी केले,
शिळा आमचा मल्हारी या गाण्यावर सादर स्वरा, मोनाली घुरडे यांनी केले,
चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर सादर आश्विनी, विनिता, कामिनी, संजीवनी यांनी केले आहे.
सर्व समाज बांधव यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली मध्ये सर्व समाज बांधव आणि भगिनींनी सहभाग घेऊन रॅली सफल केली आहे.
तसेच श्री महादेवराव पातोड, श्री मधुकरराव काळमेघ, श्री अनिल तांबडे, श्री विनोद बरडे, श्री पुरुषोत्तम डाखोळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शरद उरकुडे, सतीश होपड, राम लोही, राम सोनाग्रे, हरिष खुजे , यशवंत कातरे, ज्ञानेश्वर बांबल, अरविंद लोही, वंदना बरडे, अश्विनी उरकुडे, स्मिता तांबडे, मिनाक्षी लोही, कामिनी तवले, वैशाली कातरे, संगीता ढवळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.तसेच सर्व समाज बांधव यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला, त्याबद्दल सर्व समाज बांधव आणि भगिनींचे खूप खूप आभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर व समस्त धनगर समाज बांधव- भगिनी नागपूर यांनी मानले आहे.