लोकदर्शन ÷शिवाजी सेलोकर
: ⭕चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील एकून 36 सोसायटी चे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व संचालकांच्या सत्कार*
:
चंद्रपूर : सहकार क्षेत्र हे शेतकरी, कामगार वर्गाच्या आर्थिक विकासासाठी आहे. परंतु अलीकडे चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक १० वर्षाच्या कार्यकाळ लोटून देखील केवळ स्वतःच्या आर्थिक लाभासाठी नोकरभरती करीत आहे. चंद्रपूर मध्यवर्ती बँकेत अराजकता व गोंधळ उडालेला आहे. या विरोधात मी नेहमी राज्य सरकार केंद्र सरकार व लोकसभेत वेळोवेळी आवाज उठविला आहे. पाठपुरावा देखील करीत आहे. त्यासोबतच न्यायालयीन लढा देखील सुरु आहे. सेवा सहकारी संस्थेमधील हा विजय जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अराजकता विरोधातील विजय असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
भूमिपुत्र सामाजिक संघटनेतर्फे 31 मे 2022 रोज मंगळवार दुपारी 2 वाजता एन. डी. हॉटेल ,चंद्रपूर येथे चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील एकून 36 सोसायटी चे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, व संचालकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यासोबतच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्य त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अँड बाबासाहेब वासाडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक माजी अध्यक्ष दादा पाटील चोखारे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक डॉ अनिल वाढई, माजी संचालक देवानंद गुरू, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिनेश चोखारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हितेश लोडे, संचालन गणेश आवारी यांनी तर आभार रोशन पचारे यांनी केले. सदर कार्यक्रमला भूमिपुत्र चे प्रभाकर ताजने, नीरज बोडे, पवन आगदारी, रमेश बूचे, संतोष बांदूरकर, प्रेमानंद जोगी आसीम शेख, संजय टिपले, भुवन चिने, नामदेव जुनघरे, योगेश बोबडे, सुनील मासिरकर, नंदू टोंगे, रोशन सावे , तुळशीराम देरकर यांनी केले.