लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
नगर परिषद गडचांदूर तर्फे येथील मुक्तीधाम येथील विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा मा. सविता ताई टेकाम यांच्या हस्ते संपन्न झाले.
नगर परिषद विकास निधी अंतर्गत रुपये १२ लक्ष ११ हजर ५०० रुपयांचे निधी खर्च करून मुक्तिधांम येथे आधुनिक पद्धतीच्या सिंगल मोल्ड फौन्ड्री शवदाहिनी आणि सिमेंट गट्टू बसवून परिसराचा विकास करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास नगराध्यक्ष सविता ताई टेकाम, मिनाक्षीताई एकरे गटनेता विक्रम येरणे आरोग्य सभापती अश्विनी ताई कांबळे, महिला व बालकल्याण सभापती किरण ताई अहिरकर उपसभापती कल्पना ताई निमजे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, राहुल उमरे, अर्चना ताई वांढरे, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष महाडोडे, युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश चूदरी, माजी शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, बांधकाम विभागाचे संतोष गोरे व इतर उपस्थित होते.
सदर मुक्तीधाम हा आधी रोटरी क्लब आणि माणिकगड सिमेंट यांनी आपल्या अधिनस्त केलेला होता परंतु त्यांचे तर्फे काहीच विकास कामे न करण्यात आल्याने नागरिकांनी नगर परिषद ला मुक्तिधाम येथे विकास कामे करण्याबाबत बरीच निवेदने प्राप्त झाली होती. नगर परिषद ने नुकतेच माणिकगड सिमेंट कंपनी तर्फे मुक्तिधाम येथे सीएसआर निधी अंतर्गत इलेक्ट्रिक शवदांहिणी बसविण्याबाबत ठराव घेतला असून त्या बाबत कंपनी तर्फे अजून तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. इलेक्ट्रिक शव दाहिनी झाल्यास नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी कपात होणार असून प्रदूषण ही कमी होण्यास मदत होणार आहे. अल्ट्रा टेक सिमेंट ने नुकतेच माणिकगड सिमेंट चे अधिग्रहण केलेले असून आता तरी गडचांदूर शहरात कंपनी तर्फे सामाजिक दायित्व निधी सीएसआर अंतर्गत मोठी विकासकामे होण्याची अपेक्षा शहरातील नागरिक करीत आहेत