By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील अनुक्रमे विरूर स्टेशन, नांदा, भंगाराम तळोधी व शेणगाव या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि. ३१ ला ऑनलाईन लोकार्पण झाले.
ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी उपस्थित होते. चारही आरोग्यकेंद्रांच्या ठिकाणी संगणक व प्रोजेक्टर लावून प्रक्षेपण करण्यात आले. चारही प्राथमिक आरोग्य केंद्रे राजुरा विधानसभा क्षेत्रातील असून कोरपना तालुक्यातील नांदा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑफलाईन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवचंद्र काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शामसुंदर राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, माजी सभापती संजय मुसळे, सहा. संवर्ग विकास अधिकारी दिलीप बैलनवार, पुरुषोत्तम आस्वले, आशिष देरकर, अभय मुनोत, पुरुषोत्तम निब्रड, राजाबाबु गलगट, रत्नाकर चटप, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, ग्रामविकास अधिकारी श्रीहरी केंद्रे, धनराज डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी २०१३ पासून ते आजपर्यंत चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी केलेल्या प्रयत्नाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. काही नेते न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र कोण काय करीत आहे याबाबत जनतेला सांगायची गरच नसल्याचे सांगून त्यांनी विरोधकांचे चिमटे काढले.
संचालन शामकांत पिंपळकर यांनी केले, प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी स्वप्निल टेंभे यांनी केले तर आभार सतिश जमदाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विधानसभा क्षेत्रात तात्काळ आरोग्य सेवा द्या – आमदार सुभाष धोटे
ऑनलाईन सभेत राजुरा विधानसभा क्षेत्रात मांडवा, कवठाळा व पाटण येथे अजूनही आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारती उपलब्ध नसून तात्काळ इमारती उपलब्ध करून द्याव्या व जिवती येथे तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्या आमदार सुभाष धोटे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्या. मंत्र्यांनी मागणी त्वरित पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.