ताडी दुकाने बंद बाबत. अजित दादांनी शब्द फिरविले. आता न्यायालयीन लढा लढणार. – विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २८/०५/२०२२ :-* सोलापूरसह महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रशासनाने पाम वाईनच्या नावाने ताडी दुकाने पुनश्च सुरु केले आहे. सदर ताडी (शिंदी) दुकाने बंद करावे या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेना व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित (दादा) पवार यांच्याकडे अनेकवेळा निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली. त्या वेळेला दादांनी याविषयी उच्च स्थरीय बैठक लावण्याचे आश्वासन दिले. परंतु दि. 25/05/2022 रोजी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाव्दारे मुंबईत पुन्हा निवेदन दिले असता निवेदन वाचन करून सदर निवेदन सोलापूरच्या एक्साईज कमिशनरकडे पाठवितो. तेथे बघून घ्या असे म्हणत शिष्टमंडळाला कुठलेही प्रतिसाद दिला नाही. यावरून दादांनी ताडी दुकानाबाबत दिलेला शब्द फिरविला अशा प्रकारचे टिका शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी केली आहे.
सोलापूरसह संपुर्ण महाराष्ट्रात पाम वाईनच्या नावाने शासनमान्य ताडी दुकाने पुनश्च चालु केला आहे. त्यामुळे ताडी दुकानांना सोलापुरात सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या विरोधाला न जुमानता प्रशासन ताडी दुाकने चालु करण्याचे परवाने दिल्याने ताडी गुत्तेदार दुकाने चालु केले आहे. या विरोधात संघर्ष समिती व कामगार सेनेच्या वतीने मा. उत्पादन शुल्क अधिक्षक, मा. जिल्हाधिकारी, मा. पालकमंत्री व 288 आमदारांना निवेदन देण्यात आले. तरी कोणतीही कारवाई न झाल्याने दि. 23/02/2022 रोजी मा. उपमुख्यमंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र शासनाच्या सन 2021-22 साली ताडी धोरणाविषयी प्रशासकीय विशेष बैठक बोलविण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यावेळी मा. उपमुख्यमंत्री अजित दादांनी लवकरच बैठक बोलविण्याची आश्वासन दिले. त्यास सुमारे दोन महिने उलटून गेले तरहीही कुठलेही कारवाई न झाल्याने दि. 25/05/2022 रोजी परत एकदा मुंबई येथे कामगार सेनेचे शिष्टमंडळ मा. उपमुख्यमंत्र्यांना भेटले असता त्यांनी शिष्टमंडळास मी सोलापूर एस.पी. शी बोलतो बैठक वैगरे लावणार नाही. असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे अजित दादांनी शब्द फिरविला अशा प्रकारची टिका कारमपुरी (महाराज) यांनी केली. आहे. असे प्रत्रकात नमुद करण्यात आली. अजित दादांची या प्रकारामुळे आता ताडी विरोधी आंदोलन कोर्टाच्या माध्यतातुन लढणार असे संघर्ष समितीचे निमंत्रक आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमुपरी (महाराज) यांनी जाहिर केले. =.========================
*फोटो मॅटर :- सोलापूर व महाराष्ट्रातील ताडी दुकाने बंद करण्याबाबत मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. अजित दादा पवार साहेबांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी निवेदन दिल्या प्रसंगीच्या छायाचित्रात श्री. अजित (दादा) पवार, विष्णु कारमपुरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर व कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *