लोकदर्शन 👉 मोहन भारती
—————————————-
कोरपना :
कोरपना तालुक्यातील महत्वाची बँक म्हणून बँक ऑफ इंडिया शाखा वनसडीची ओळख आहे , मोठं मोठे व्यवहार या बँकेतून होत असतात पण गेल्या महीन्याभरापासून या शाखेत मॅनेजर रुजू न झाल्याने अनेक व्यवहार खोळंबले आहे ..
बँकेचे मॅनेजर नसल्याने शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी थांबून राहावे लागत आहे , ऐन हंगामात पैश्याची जुळवाजुळव झाली नाही तर शेतकऱ्यांनसमोर मोठं संकट उभे राहणार आहे त्यामुळे शेतकरी व खातेदारांची गैरसोय न होता त्वरित मॅनेजर नियुक्त करून व्यवहार सुरळीत करावे अशी मागणी होत आहे