लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
गोवा ÷ देशातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची क्रेडाई ही देशपातळीवरील संघटना आहे.या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथे पार पडत आहे.या अधिवेशनला (महाकाँन) या नावाने संबोधले जाते.या अधिवेशनाला देशभरातील बांधकाम व्यावसायात अग्रेसर असलेल्या निमंञीत मान्यवरांची उपस्थिती असते.सदरील महाकाँन मध्ये महाराष्ट्राचे राज्य विस्तार म्हणून डाँ धर्मवीर भारती यांनी आपली भुमिका मांडली.लातूरच्या बांधकाम व्यावसायिकां साठी ही अभिमानाची बाब आहे.