लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती येथे माती परीक्षण केंद्रासाठी निधी उपलब्ध करण्यची घोषणा.
राजुरा (ता.प्र) :– तालुका कृषी अधिकारी राजुरा यांचे कार्यालयात खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून, पिक पद्धतीत प्रयोगात्मक बदल करून सुधारीत शेतीचा अवलंब करावा तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांना अधिक सक्षमपणे शेती करता यावी यासाठी राजुरा, गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती या चारही तालुक्यात माती परीक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच तहसील कार्यालय परिसरात शेती उपयोगी यंत्रसामुग्री चे उद्घाटन करण्यात आले. यात मिनी बेडमेकर, बीज प्रक्रिया ड्रम, ट्रॅक्टर, व शेती उपयोगी इतर यंत्रांचा समावेश आहे.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब वऱ्हाटे, आत्मा समितीचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, आत्मा समितीचे सदस्य मनीषा देवाळकर, माजी सरपंच शंकर गोनेलवार, वर्षा पिंगे, सुनील बरेकर (चिमुर), पांडुरंग सिडाम (येरगव्हण), गजानन जुनघरी (पेल्लोरा) आकाश चौथले, अरुण सोमालकर, लहू चहारे, शिवणकर यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.