लोकदर्शन मुंबई,👉 राहुल खरात
दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात विधवा प्रथेचे उच्चाटन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ)चे सरपंच सुरगोंडा पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार 27 मे व शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. सहायक संचालक संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्राने नेहमीच पुरोगामी विचारांचा स्वीकार केला आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर यांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने अधुनिकतेचा स्वीकार करत आपल्यातील अनिष्ट प्रथांना विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने हाच पुरोगामी विचार पुढे नेत विधवा प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला महाराष्ट्र शासनाने पाठिंबा दिला आहे. या निर्णयाबद्दलची सविस्तर माहिती हेरवाडेचे सरपंच श्री.पाटील यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.