लोकदर्शन 👉 मोहन भारती
कढोली खुर्द येथे वाचनालय आणि व्यायामशाळेचे लोकार्पण.
कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा काढोली खुर्द येथे प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत व्यायमशाळा इमारत २० लक्ष रुपये आणि वाचनालय इमारत २० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे लोकार्पण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, माणसाच्या जडणघडणीत मन, बुद्धी, भावना आणि शरीर यांवर नित्यनेमाने सुसंस्कार होण्याची गरज असते. व्यक्तीमत्व विकास ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. व्यक्तीमत्व विकासासाठी नियमित वाचन आणि व्यायामाची गरज ही प्रत्येकांना आहे. त्यामुळे वाचनालय आणि व्यायामशाळेचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि. प. सदस्य विनाताई मालेकर, सरपंच निर्मला मारकोल्हे, माजी जि. प. सदस्य उत्तमराव पेचे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश मालेकर, मुरर्लिधर बल्की, प्रशांत मसे, प्रा आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, सिध्दार्थ वानखेडे, राहुल बोडे, भास्कर मत्ते, वृंदा वडस्कर, रामुजी कुळसंगे, नीलकंठ वडस्कर, नाना पाटील कोवे, संदीप धोटे, दत्ता उपरे, रोशन आस्वले, विलास मडावी, कल्पतरू कन्नाके, अशोक आस्कर, मिलिंद ताकसांडे यासह गुरुदेव सेवा मंडळ, शिवाजी स्पोर्टींग कल्ब, दत्त गुरुदेव सेवा मंडळ, जय सेवा बहुउद्देशिय संस्था कढोली खुर्द चे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्तीत होते, कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक दत्ता मसे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता उपरे यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.