लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
जिल्हा रक्तपेढी येथे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, तो भरून काढण्यासाठी कोरपना, जिवती तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे,
प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती व पाटण येथे 28 मे ला सकाळी 10 ते 2 पावेतो रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहेत.
30 मे ला नारंडा येथे तर 1 जून ला कवठाळा येथे रक्तदान शिबीर होणार आहेत,
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, युवा संघटना यांनी 18 ते 60 वयोगटातील निरोगी व्यक्ती ला रक्तदान करण्यास प्रवृत्त करून राष्ट्रीय करण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिताली सेठी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड,चंद्रपूर जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ हजारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी केले आहेत,
,,,,,,,,,,,
रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्या ला शसनाच्या वतीने प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येणार आहे,
,,,,,,,,,,,,,,,
,