By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
चंद्रपूर : मूल तालुक्यातील भेजगाव येथे तलावाचे खोदकाम सुरू असताना यमराज मूर्ती आढळून आली आहे. यमराजाचे वाहन रेडा असून ते गदा धारण करतात. येथे आढळून आलेली यमराज मूर्ती आणि भेजगावचे शिव मंदिर परमार कालीन आहे.निर्मितीचा कार्यकाल बारावे ते तेरावे शतक हा आहे. या प्रकारची यम प्रतिमा परमार कालीन कित्येक मंदिरांमध्ये दिसून येतात. भटाडा व मार्कंडा मंदिर याची साक्ष आहे, अशी माहिती चंद्रपूर येथील प्रसिद्ध इतिहास इतिहास तज्ज्ञ
अशोक सिंह ठाकुर यांनी दिली आहे.